Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

डॉ. पायल आत्महत्याप्रकरणी पहिली अटक; आग्रीपाडा पोलिसांची कारवाई

Spread the love

जातीवरून अपमानित करून मानसिक त्रास देऊन डॉ. पायल तडवी हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तीन महिला डॉक्टरांविरुद्ध आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर  याप्रकरणी एक आरोपी  डॉ. भक्ती मेहेरला आज अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. या प्रकरणात केलेली हि पहिलीच अटक आहे.

तीन महिला सहकारी डॉक्टरांकडून होणाऱ्या रँगिंगला कंटाळून डॉ.पायल तडवी यांनी २२ मे रोजी गळफास घेऊन नायर हॉस्पिटलच्या वसतिगृहात आत्महत्या केली होती . याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तीन महिला डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचे पडसाद संबंध महाराज्यात उमटले आहेत. नायर रुग्णालयाबाहेर आंदोलनं देखील करण्यात आली. याची दखल  राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी या आंदोलनस्थळी भेट दिली आणि आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती दिली होती. या प्रकरणामुळे संबंध राज्यात होणारा उद्रेक पाहता पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलत डॉ. भक्ती हिला बेड्या ठोकल्या आहे.

याप्रकरणात अन्य दोन महिला डॉक्टर डॉ. अंकिता खंडेलवाल आणि डॉ. हेमा आहुजा या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र, या तिन्ही महिला डॉक्टरांनी कोर्टात अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामिनाचे अर्ज दाखल केले होते. उद्या या अटकपूर्व जामीन अर्जावर कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बीवायएल नायर हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या स्त्री रोग विभागात दुसऱ्या वर्षात (एम.डी) शिक्षण घेत असलेल्या डॉ.पायल तडवी यांना वरिष्ठ असलेल्या सहकारी डॉ. हेमा आहुजा, डॉ.भक्ती मेहेरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघांकडून मानसिक त्रास आणि जातीवरून अपमानित केले जात होते. याला कंटाळून पायलने टोकाचा निर्णय घेत गळफास घेऊन आत्महत्या केली होती .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!