Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

संविधानाचे दर्शन घेऊन आज म्हणाले मोदी , अल्पसंख्यकांचा आजवर फार छळ झाला, आता सबका साथ सबका विकास …

Spread the love

आपणास आठवत असेल मोदी जेंव्हा २०१४ मध्ये पहिल्यांदा संसदेत गेले होते तेंव्हा त्यांनाही संसदेचे दर्शन घेतले होते . आज जेंव्हा त्यांची संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या एनडीएच्या बैठकीत एकमताने एनडीए नेतेपदी निवड झाल्यानंतर मोदींनी नवनिर्वाचित खासदारांना मार्गदर्शन केलं. प्रारंभी त्यांनी सेंट्रल हॉलमध्ये ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतीपुढे नतमस्तक होऊन आपल्या भाषणाला भाषणाला सुरुवात केली. यावेळी आपल्या भाषणात विविध मुद्द्यांवर मोदींनी परखडपणे आपली भूमिका स्पष्ट केली. देशात अल्पसंख्यकांचा आजवर फार छळ झाला. त्यांना भीती दाखवली गेली. त्यांचा नेहमीच ‘व्होटबँक’ म्हणून वापर झाला. आपल्याला त्यांचा विश्वास संपादन करावा लागेल. त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावं लागेल, असे नमूद करत ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हाच आपला मंत्र असल्याचा पुनरूच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या बैठकीत बोलताना केला.

 

देशातील अल्पसंख्यक समाज कशाप्रकारे व्होटबँकेच्या राजकारणात भरडला गेला आहे, त्यावर बोट ठेवत मोदींनी अल्पसंख्यकांचा विश्वास संपादन करण्याचा मनोदय बोलून दाखवला. आपल्या देशात ज्या पद्धतीने गरीब जनतेचा छळ केला गेला त्याच पद्धतीने अल्पसंख्यकांनाही छळाचा सामना करावा लागला. त्याला एकप्रकारची भीती दाखवून त्याची गळचेपी केली गेली. या समाजाचं शिक्षण, आरोग्य याचा कधीच विचार केला गेला नाही. २०१९ मध्ये आपल्याला यास छेद द्यायचा आहे. आपल्याला अल्पसंख्यकांचा विश्वास संपादन करायचा आहे, असे आवाहन मोदींनी केले.

जनतेचा विश्वास संदापन केल्यामुळेच पुन्हा एनडीए सरकारला जनतेने कौल दिल्याचे मोदी म्हणाले. विश्वासाचा धागा दृढ झाला तरच प्रो-इन्कंबंसीची लाट निर्माण होते आणि तेच या निवडणुकीत झाले, असे मोदी म्हणाले. जे जिंकून आलेत ते सगळेच माझे आहेत, असा विश्वास मोदींनी नवनिर्वाचित खासदारांना दिला. वर्तमानपत्रांच्या पानांमधून कुणी मंत्री बनत नाही वा कुणाचं मंत्रिपद जात नाही. अशा बातम्या केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठीच पेरल्या जातात. अशा बातम्यांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही, असेही मोदी म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!