नथुराम देशभक्त प्रकरणी साध्वी प्रज्ञावर कारवाईचे संकेत

Advertisements
Spread the love

भोपाळ लोकसभा मतदारसंघातली भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तिने माफी मागितली. मात्र हा वाद एवढ्यावरच संपण्याची चिन्हे नाहीत. कारण साध्वीच्या वादग्रस्त विधानाची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. मध्य प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून आयोगा याबाबतचा अहवाल मागवला आहे. या प्रकरणात साध्वी प्रज्ञावर कारवाईचे संकेत आहेत .

मक्कल निधी मय्यम पक्षाचे सर्वेसर्वा आणि अभिनेता कमल हासन यांनी नथुराम गोडसे हा स्वातंत्र्योत्तर भारतातील पहिला  दहशतवादी होता, असे विधान केले आहे. याबाबत साध्वी प्रज्ञाची प्रतिक्रिया मागितली असता, नथुराम गोडसे देशभक्त होते, देशभक्त आहेत आणि देशभक्तच राहणार आहेत. त्यांना हिंदू दहशतवादी म्हणणाऱ्यांनी आधी आपण स्वत: काय आहोत, हे पाहायला हवे. अशा व्यक्तींना जनता निवडणुकीत धडा शिकवेल’, असे ती म्हणाली होती.

निवडणूक आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की साध्वी प्रज्ञाच्या कथित वक्तव्याबाबत मध्य प्रदेशच्या सीईओंना शुक्रवारपर्यंत अहवाल देण्यात सांगण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रज्ञाने राष्ट्रपिता महात्मा गांधींविषयी अपमानास्पद वक्तव्य केले आहे, ज्यामुळे निवडणुकांदरम्यान अशांतता पसरू शकते, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. साध्वी प्रज्ञाविरोधात कारवाईची देखील शिफारस करण्यात आल्याचे समजते.

Leave a Reply