प्रज्ञा ठाकूरच्या विधानावर प्रियांकाने ट्विट केले ” हे राम !!”

Advertisements
Spread the love

साध्वी प्रज्ञा यांनी नथुराम हा देश भक्त होता आहे आणि राहिल अशी प्रतिक्रिया दिली आहे. ज्याबाबत आता काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महात्मा गांधी यांची हत्या करणारा माणूस देशभक्त? हे राम! अशा आशयाचे ट्विट करत प्रियंका गांधी यांनी त्यांचा संताप व्यक्त केला आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि राहिल असं म्हणत त्याला दहशतवादी ठरवणाऱ्यांना धडा शिकवू असे म्हटले आहे. त्यानंतर अनेक प्रतिक्रिया देशभरातून उमटत आहेत.

काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी हे राम असं म्हणत त्यांचा संताप समोर आणला आहे. साध्वी प्रज्ञा यांच्या या प्रतिक्रियेनंतर भाजपाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी केली. आता काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्विट करून त्यांचा संताप व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकांचा शेवटचा टप्पा बाकी आहे. त्यात या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच नथुराम गोडसेचे नाव घेऊनही राजकारण रंगताना दिसतं आहे.

Leave a Reply