Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

रामदास आठवले यांना सत्ता येण्यापूर्वी व सत्ता आल्यानंतर राज्यात आणि केंद्रात मंत्रिपदाची आशा…

Spread the love

विधानसभा निवडणुकीत महायुतीसोबतच आरपीआय असणार  असून  दहा जागांची मागणी आरपीआयकडून करण्यात आली आहे. सत्ता येण्यापूर्वी व सत्ता आल्यानंतर होणा-या मंत्रिमंडळ विस्तारात आरपीआयला आणखी मंत्रीपद मिळेल तर केंद्रीय मंत्री मंडळातही कॅबिनेट मंत्रीपदही मिळेल असा दावा यावेळी आठवले यांनी केला.

रामदास आठवले हे सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी पाहणी दौºयासाठी आले होते. तत्पूर्वी दुपारी त्यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, के. डी. कांबळे, बाबू बनसोडे,  राजरत्न इंगळे, चंद्रकांत वाघमारे, राजू ओहोळ, सोमनाथ भोसले आदी उपस्थित होते.

नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना आठवले म्हणाले की, वंचित आघाडीसोबत भरकटलेले, अपरिपक्व कार्यकर्ते गेले. बारामतीत कमळासमोर बटण दाबल्यावर घड्याळालाच मतदान गेले. राज ठाकरे यांच्या सभेचा निगेटिव्ह परिणाम होणार नाही. वंचित आघाडीत  फूट पडतेय , त्यामुळे गेलेले माझ्याकडे परत येतील असे सांगत  दुष्काळी उपाययोजनाबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले़

आपलं सरकार

Click to listen highlighted text!