It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

क्यों कि, इतना प्यार तुमसे करते है हम , दाखविण्यासाठी त्याने घेतले विष …!! प्रियकराची प्रकृती नाजूक

Advertisements

<SCRIPT charset=”utf-8″ type=”text/javascript” src=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=GetScriptTemplate”> </SCRIPT> <NOSCRIPT><A rel=”nofollow” HREF=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=NoScript”>Amazon.in Widgets</A></NOSCRIPT>

Spread the love

आपले प्रेम दाखवण्यासाठी एका प्रियकराने विष प्राशन केल्याची घटना साताऱ्यात घडली. या प्रियकरावर सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती सध्या नाजूक आहे. प्रेयसी विष घे म्हणून हे पाऊल उचलल्याची माहिती त्यानं पोलिसांना जबानीत दिली. आज दुपारी ही घटना घडली.

साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीत राहणारा प्रियकर २८ वर्षांचा आहे. तो एका गाडीवर चालक म्हणून काम करतो. रविवारी दुपारी त्याने सिव्हिल हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर सुरूवातीला तीन बाटल्या बिअर प्यायला. त्यानंतर त्याने त्याच्या प्रेयसीला फोन केला. ‘मी तुझ्यावर किती प्रेम करतो, हे पाहायचे असेल तर मी कीटकनाशक पिऊ का,’ असे तिला विचारले. प्रेयसीनेही तत्काळ होकार दिला. त्यानंतर तो राऊंडअप हे तणनाशक प्यायला.

Advertisements


Advertisements

घडलेला प्रकार सिव्हिल हॉस्पिटलसमोर असलेल्या काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी प्रियकराला उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती त्याच्या प्रेयसीलाही मिळाली. त्यानंतर त्याची प्रेयसी अन्य मैत्रिणींना घेऊन सिव्हिलमध्ये दाखल झाली. ‘माझी प्रेयसी विष घे,’ असे म्हणाल्याने मी विष घेतले असल्याचा जबाब प्रियकराने  जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिसांना दिला. प्रियकराची प्रकृती सध्या नाजूक आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.