सुरक्षा दलाच्या वर्दीत भाजप आणि संघाचे कार्यकर्ते असल्याचा ममतांचा संशय

Advertisements
Advertisements
Spread the love

पश्चिम बंगालमधील मतदारांना प्रभावित करण्यासाठी भाजप आणि आरएसएसचे कार्यकर्ते सुरक्षा दलांच्या वर्दीत येत आहेत, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे . तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारची एक्सपायरी डेट सुरू आहे. त्यामुळे तिथे हिंसेचे तांडव सुरू आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी केलीय.

Advertisements

केंद्रीय सुरक्षा दलांचा मला अपमान करायचा नाहीए. पण मतदारांना प्रभावित करण्याचे निर्देश त्यांना दिले गेलेत. पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय सुरक्षा दलांच्या तैनातीच्या नावाखाली भाजप बळजबरीने भाजप आणि आरएसएसचे कार्यकर्ते पाठवत आहे. आरएसएस कार्यकर्त्यांना वर्दीत पाठवण्यात येतंय असा मला संशय आहे, असं दक्षिण परगणा जिल्ह्यातील एका जाहीर सभेत ममता बॅनर्जी म्हणाल्या.

Advertisements
Advertisements

केंद्रीय सुरक्षा दलांनी एका मतदान केंद्रात गोळीबार केला. अल्पसंख्याक समाजातील तृणमूल काँग्रेसचा एक कार्यकर्ता यात जखमी झाला. तसंच केंद्रीय सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांकडून रांगेतील मतदारांना भाजपला मतदान करण्यास सांगण्यात येतंय, असा आरोप ममता बॅनर्जींनी केलाय. भाजपला मत द्या, हे सांगण्याचं काम सुरक्षा दलांचं आहे का? हे कसं काय होऊ शकतं? काही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा प्रयोग मोदी सरकारकडून मतदान करण्यासाठी केला जातोय. हे करतांना लाज वाटत नाही का? सुरक्षा दलाचे कर्मचारी आपलं कर्तव्य बजावण्यासाठी इथं आलेत. आज तुम्ही मोदींसाठी काम करताय. उद्या दुसरा कुणी येईल. तेव्हा काय कराल?, असा प्रश्न ममता बॅनर्जींनी उपस्थित केला.

आपलं सरकार