बारामतीत इलेक्ट्रॉनिक शोरूमला भीषण आग कोट्यावधीचा माल भस्मसात

Advertisements
Spread the love

बारामती शहरातील भिगवण रोडवरील  महालक्ष्मी इलेक्ट्रॉनिक्स शोरूमला आज सकाळी दहाच्या सुमारास  भीषण आग लागली. या आगीमध्ये शोरूममधील सर्व साहित्य व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक झाल्या. सबंधीत शोरूम मालकाचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे.
भिगवण रस्त्यावरील सेवा रस्त्यावर हे शोरुम असून सकाळी रस्त्यावरुन जाणाऱ्या काही नागरिकांना आतून धूर येत असल्याचे दिसले. शोरूम मालक घटनास्थळावर येण्यापूर्वीच आगीने रौद्र रुप धारण केले होते. काही क्षणातच या शोरुममध्ये असलेले टीव्ही, रेफ्रिजेटर्स, एअरकंडीशनर्स, मायक्राेव्हेव ओवन, पंखे, मिक्सर, कूलर्स, म्युझिक सिस्टिम अशा अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक झाल्या. बारामती नगरपालिका, एमआयडीसीच्या अग्निशामक दलांनी आग तासाभराच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आणली. या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याची शक्यता आहे. नुकसानीचा नेमका आकडा समजू शकला नाही. शोरुम व त्या मागे असलेल्या गोदामापर्यंत आग भडकलेली असल्याने नुकसानीची तीव्रता अधिक होती. साधनांचा अभाव असूनही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जिवाची बाजी लावून ही आग आटोक्यात आणली.

Leave a Reply