Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वंचितच्या सभेला भर उन्हात लोकांची गर्दी पण प्रकाश आंबेडकरांचे हेलिकॉप्टर उतरवण्यास परवानगी न दिल्याने कार्यकर्ते संतप्त

Spread the love

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे हेलिकॉप्टर  उतरवण्यास बदलापुरात परवानगीच न मिळाल्याने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बदलापूरात आयोजित केलेली वंचित बहुजन आघाडीची सभा कार्यकर्त्यांना आटोपती घ्यावी लागली.  मात्र, सकाळपासून जमलेल्या कार्यकर्त्यांचा यामुळे हिरमोड झाला आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या बदलापूर शहरात  वंचित बहुजन आघाडीने जोरदार  शक्तीप्रदर्शन करण्याचे आयोजन केले होते. त्यासाठी बदलापूर पश्चिमेतील हेंद्रेपाडा येथील रोडू हेंद्रे घोरपडे मैदानात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली होती. त्यासाठी सभेची पूर्ण तयारीही झाली होती.

या सभेसाठी सकाळपासून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सभेच्या ठिकाणी जमण्यास सुरूवात झाली होती. भर उन्हातही सभेत गर्दी होती. मात्र प्रमुख पाहुण्यांबद्दल कोणतीही सूचना मिळत नसल्याने उपस्थितांमध्ये नाराजीची भावना होती.  सभेची वेळ दुपारी दोनपर्यंत होती. मात्र प्रकाश आंबेडकर वेळेत बदलापूरात येऊ न शकल्याने अखेर सभा गुंडाळावी लागली. त्यामुळे दोनच्या सुमारास ही सभा रद्द् करण्यात आल्याची घोषणा उमेदवार डॉ. अरूण सावंत यांनी सभेत केली. प्रारंभी  सभा रद्द करण्यासाठी वेळेचे कारण दिले होते परंतु मात्र प्रमुख वक्त्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी बदलापूरात परवानगी दिली जात नसल्याचे कारण आता उघड झाले आहे.  पोलिस प्रशासनाने वेळेत परवानगी दिली असती तर सभा झाली असती ,  या कारणाने सभा रद्द केल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि उपस्थितांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.

उरणमध्ये ओवेसीची सभा
दरम्यान उरणमध्ये बहुजन वंचित आघाडीची शनिवारी २७ एप्रिल रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेला खासदार असुद्दीन ओवेसी आणि बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहणार असल्याने या मतदार संघात बहुजन वंचित आघाडीकडे मुस्लीम व मागासवर्गीय मतदारांचा कल वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!