Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लोकसभा निवडणूक २०१९ लाइव्ह: देशात सरासरी ६१.३१ टक्के मतदान

Spread the love

संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राज्यात 61.30 टक्के मतदान

मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात देशाच्या १३ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील ११७ मतदारसंघांत मतदान झाले.  त्यात महाराष्ट्रातील १४ मतदारसंघांचाही समावेश आहे. …

केवळ एका मतदारासाठी स्वतंत्र मतदान केंद्र; १०० टक्के झालं मतदान

संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राज्यात 61.30 टक्के मतदान, अशी आहे मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी

जळगाव 58, रावेर 58, जालना 63,  औरंगाबाद 61.87, रायगड 58.06, पुणे 53, बारामती 59.50, अहमदनगर 63, माढा 63, सांगली 64,  सातारा 57.06, रत्नागिरी-सिंधुदुर्ग 62.76, कोल्हापूर 69, हातकणंगले 68.50.

रायगड लाेकसभा मतदार संघांतर्गत महाड विधानसभा मतदार संघातील देशमुख कांबळे गावांतील 108 वर्षांच्या ज्येष्ठ मतदार सुलाेचनाबाई गाेविंद देशमुख यांनी देशमुख कांबळे मतदान केंद्रावर मतदानाचा आपला हक्क आवर्जून बजावल्यावर महाड विधानसभा मतदार संघाचे सहा.निवडणुक निर्णय अधिकारी विठ्ठल ईनामदार यांनी भारत निवडणुक आयाेगाच्यावतीने आदरपूर्वक गाैरव केला.

110 वर्षांच्या गंगुबाई चव्हाण यांनी केले मतदान; निवडणुक आयाेगाकडून मतदान केंद्रावर विशेष सत्कार

सोलापूर – सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी जेऊर येथे मतदानाचा हक्क बजावला

सैन्यदलात कार्यरत असलेल्या बावधन (ता. वाई) येथील शिवराज देवराम ठोंबरे (वय २४) यांनी लग्नापूर्वी बावधन येथील मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क.

औरंगाबाद : पल्लवी तुपे या वधूचे विवाह मुहूर्त पुढे ढकलून मतदान

पुणे : लग्नापूर्वी श्रद्धा भगत हिचे मतदान

सुप्रिया संजय गुरव या नववधुने रायगड लाेकसभा मतदार संघातील दापोली 263 विधानसभा मतदारसंघातील जालगाव 266 मतदान केंद्रावर प्रथम मतदानाचा हक्क बजावला व मग  लग्न मंडपात रवाना झाली. सुप्रीयाचे वडील संजय गुरुव हे दापोली तालुक्यात मंडल अधिकारी ( सर्कल) म्हणून कार्यरत आहेत.

जळगाव : अभोणे ता. चाळीसगाव येथील योगेश म हाले या नवरदेवाने मतदान केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात मतदान केले

सांगली : विद्यमान खासदार आणि भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी चिंचणी या मूळ गावी रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला.

खासदार सुप्रिया सुळेंनी बजावला मतदानाचा हक्क

कोल्हापूरमध्ये सात ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद

औरंगाबादमध्ये ईव्हीएम बंद असल्याने मतदारांमध्ये संताप

माढ्यामध्ये ठिकठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड

महाराष्ट्रात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५७.०१ टक्के मतदान

आपलं सरकार

Click to listen highlighted text!