सभेला झालेली गर्दी बघून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडेल: पंतप्रधान नरेंद्र मोदी

Spread the love

वर्ध्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाला मराठीतून  सुरुवात केली . त्यांनी सर्वप्रथम इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं . यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चरखा देऊन स्वागत करण्यात आले . लोकसभा निवडणुकीतील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आज, सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वर्ध्यात जाहीर सभा होत आहे. स्वावलंबी मैदानावर सकाळी ११.४० वाजता ही सभा  सुरु झाली . गांधी जिल्ह्यात आल्यानंतरही मोदी सेवाग्रामला जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान  सुरक्षेच्या कारणास्तव सेवाग्रामचा  दौरा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मोदी हे सेवाग्रामला येणार असल्याचे आधी सांगण्यात आले होते. पण, आता ते येणार याविषयीची माहिती देण्यात आलेली नाही’, असे सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी. आ. एन. प्रभू यांनी सांगितले. वर्धा येथील महायुतीच्या प्रचारसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची उपस्थिती आहेत . विदर्भामधील लोकसभेच्या दहा जागा महायुतीच जिंकणार,  असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे . काँग्रेसने ५० वर्षे देशाला एप्रिल फूल बनवलं असेही  देवेंद्र फडणवीस म्हणाले .

आपलं सरकार