Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

डॉ. मुरली मनोहर जोशींची जागा सत्यदेव पचौरीना तर मनेका गांधी आणि वरुण यांच्या जागेत अदला बदल

Spread the love

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आणखी ३९ उमेदवारांची घोषणा केली असून ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्या कानपूर मतदारसंघातून सत्यदेव पचौरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर समाजवादी पक्षातून आजच भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या अभिनेत्री जयाप्रदा यांना रामपूरमधून सपा नेते आझम खान यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आली असून केंद्रीय मंत्री मनेका गांधी व पुत्र वरुण गांधी यांच्या मतदारसंघांत अदलाबदल करण्यात आली आहे.

म्हणजे सुलतानपूर मतदारसंघातून मनेका गांधी यांना उमेदवारी दिली असून वरुण गांधी यांना पीलीभीतमधून निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे. गेल्या निवडणुकीत मनेका पीलीभीतमधून तर वरुण हे सुलतानपूरमधून निवडणूक लढले होते.

भाजपने आज जाहीर केलेल्या यादीत उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री रीटा बहुगुणा जोशी, केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा, माजी केंद्रीय मंत्री रामशंकर कठेरिया अशी आणखी काही प्रमुख नावे असून उत्तर प्रदेशातील २९ तर पश्चिम बंगालमधील १० उमेदवार पक्षाने जाहीर केले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!