News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या #Top 21 News

1. CSMT येथे पादचारी पूल कोसळून ६ ठार, ३२ जखमी
2. मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा : जखमींना ५० हजारांची मदत जाहीर तर उपचाराचा खर्च सरकार करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
3. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट प्रकरणी विरोधी पक्षांची सर्वोच्च न्यायालयात धाव; याचिकेत २१ नेत्यांची नावे, उद्या सुनावणी
3. आपल्या जनसंबोधनात पंतप्रधान मोदी नेहमी दुसऱ्यांना नाव ठेवायतात, ते कधीही चांगलं बोलले नाहीत , भाजप, रा. स्व. संघ आणि सीपीएम राज्यात हिंसा पसरवत आहेत. हिंसा करणे कमकुवतांचं लक्षण- राहुल गांधी
4. भाड्याच्या घरात राहात असलेल्या २१ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात आरोपी घरमालक सय्यद समीर सय्यद रफिक याचा नियमित जामीन अर्ज फेटाळला
5. बसव धर्मपीठाचे प्रमुख माते महादेवी यांचं बेंगळुरूत निधन
6. मसूद अझरप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुसद्देगिरी सपशेल अपयशी; एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांची टीका
7. वॉड्रा जमीन घोटाळ्यात राहुल गांधी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभेः भाजपचा आरोप
8. लोकसभा निवडणुकीसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे २० मार्च रोजी भूमिका जाहीर करणार
9. नगरमधील जैन समाज एकत्र; दिलीप गांधी याना उमेदवारी नाकारली तर वेगळ्या विचाराचा इशारा; देशभरात परिणाम होईल असेही केले स्पष्ट, मोदींवर टीका करणाऱ्या आयात उमेदवारांना पक्षात घेऊन तिकीट जाहीर करणे चुकीचे असल्याचेही मत व्यक्त.
10. लोकसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाची पहिली यादी १६ मार्च
11. इयत्ता नववीचा अभ्यास कठीण जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर यांच्या १४ वर्षीय मुलाची आत्महत्या.
12. राष्ट्रवादी काँग्रेसने केली लोकसभा निवडणुकीसाठीची पहिली यादी जाहीर. पहिल्या यादीत १२ मतदारसंघांचा समावेश. राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीत पार्थ पवार यांचे नाव नाही. रायगडमधून सुनील तटकरे यांना, तर बारामतीमधून सुप्रिया सुळे, लक्षद्वीपमधून महम्मद फैजल, ठाण्यातून आनंद परांजपे, कल्याणमधून बाबाजी पाटील, साताऱ्यातून उदयनराजे भोसले, कोल्हापूर- धनंजय महाडीक, जळगावमधून गुलाबराव देवकर, परभणीमधून राजेश विटेकर, हातकणंगलेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली. राष्ट्रवादीच्या पहिल्या उमेदवार यादीत माढा, अहमदनगर, मावळ, बीड, गोंदिया या मतदारसंघांचा समावेश नाही. ईशान्य मुंबईमधून संजय दीना पाटील, बुलडाण्यातून राजेंद्र शिंगणे. अहमदनगरमध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना मानणारे आम्हाला पाठिंबा देतील- जयंत पाटील.
13. मी अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार करणार नाही- राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका.
14. बाळासाहेब थोरात स्वत:ला हायकमांडपेक्षा मोठे समजतात का?: थोरात यांच्या वक्तव्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका.
15. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना-भाजप युतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात गुरुवारी कलश पूजन करण्यात आले. पूजनानंतर खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्या आई वत्सलाबाई यांचे घेतले आशीर्वाद.
16. मसूद अजहर प्रकरणी चीनच्या भूमिकेवर भारत दु:खी आहे: भाजप
17. माझ्यापर्यंत अद्याप कुठलाही निर्णय पोहचलेला नाही, उद्धव ठाकरेंचा निर्णय मला मान्य असेल, मी अजूनही आशावादी आहे- अर्जुन खोतकर, दुग्धविकास राज्यमंत्री.
18. निवडणुकीनंतर भारिप बहुजन महासंघ हा पक्ष वंचित बहुजन आघाडीत विलीन करणार- प्रकाश आंबेडकर यांची घोषणा. विरोधकांची युती होऊ नये म्हणून भाजप ब्लॅकमेलिंग करतो.
19. औरंगाबाद: शहाबाजार येथे पीओपी व्यवसायिकावर दोन गुंडांचा तलवारीने हल्ला, भरदुपारी जुन्या वादातून झाला हल्ला.
20. तीन दिवसांपूर्वीच आत्महत्या केलेल्या मुलीच्या विरहाने पित्याचीही आत्महत्या; औरंगाबाद सोयगाव, तालुक्यातील घटना
21. राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून विधानपरिषदेचे आमदार अरुण जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे त्यांची लढत भाजपाचे डॉ. सुजय विखे यांच्याशी होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कामाला लागा असे आदेश दिले.
महानायक ऑनलाइन ……. सर्वसमावेशक पोर्टल, पटल आपल्याला. जबरदस्त.
Thanks . keep in touch .