काॅंग्रेसची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता

काँग्रेसची दुसरी यादी आज जाहीर होणार होणार असल्याचे वृत्त आहे. या यादीत महाराष्ट्रातील १२ नावांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणुकांच्या घोषणे अगोदरच ७ मार्चला काँग्रेसने लोकसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून त्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा समावेश आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन आठवडे उरले आहेत. अशावेळी कोणता पक्ष कोणत्या उमेदवाराला तिकीट मिळणार याबद्दल कार्यकर्त्यां मध्ये उत्सुकता वाढली आहे.उमेदवारांची यादी जाहीर करण्यात पहिला नंबर काँग्रेसने लावला आहे. गुरुवार ७ मार्चला काँग्रेसची पहिली यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर आज काँग्रेसची दुसरी यादी जाहीर होईल असा अंदाज आहे.ज्या ममतदारसंघांमध्येउमेदवारीसाठी एकाहून अधिक दावेदार नाहीत त्या मतदारसंघांमधील उमेदवारांची नावं आज जाहीर केली जाणार आहेत. यात महाराष्ट्रातील १२ उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे. सोलापुरातून सुशीलकुमार शिंदे नांदेडमधून अमिता चव्हाण,उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त यांची नावं जवळपास निश्चित असल्याची चर्चा आहे.