News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या…

Advertisements
Spread the love

News Updates : गल्ली ते दिल्ली :एक नजर : महत्वाच्या बातम्या…

१. विंग कमांडर अभिनंदन यांच्या मिशांच्या स्टाईलची तरुणांमध्ये क्रेझ!

२. मोदी सरकारनं एअर स्ट्राइकमध्ये २५० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला- अमित शहा

३. आधी देशाचे जवान शहीद व्हायचे, आता पाकिस्तानच्या ताब्यातील वैमानिकाची २४ तासात सुटका होते- अमित शहा

४. भाजपा स्वत:चं एअर स्ट्राईक केल्याच्या आविर्भात- कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी

५. समझोता एक्स्पेसची सेवा बहाल; केवळ १२ प्रवाशांचा प्रवास, दोन्ही देशांमधील तणावामुळे रद्द करण्यात आली होती सेवा

६. भारतीय हवाई दलाने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकबद्दलची माहिती योग्य वेळी सार्वजनिक केली जाईलः केंद्रीय शहरविकास राज्यमंत्री हरदीप सिंह पुरी यांचं प्रतिपादन

७. भारतीय हवाई दलाने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना देशद्रोही म्हणणे चुकीचे आहे. या प्रत्युत्तराबाबत सरकारलाही स्पष्ट माहिती नाही; पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांचं ट्विट

८. व्हिडिओकॉन कर्ज खटलाः चंदा कोचर यांची ईडीकडून १० तास चौकशी

९. पवारांनी दगदग करु नये; बारामतीसह सर्व जागा जिंकणार : पालकमंत्री चंद्रकांत पाटील विश्वास

१०. रवींद्र जडेजाच्या पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश

११. दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर पंतप्रधान मोदी; जनसभेला संबोधित करणार

 १२. कॅगपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्वांनी राफेल कराराबाबत सकारात्मकता दाखवली. मात्र, काही जण कमिशन मिळालं नाही, म्हणून खोटं पसरवत आहेत – पंतप्रधान मोदी

१३. बालाकोट हल्ल्याचे पुरावे मागणारे विरोधक देशाच्या भावना दुखावत आहेत – केंद्रीयमंत्री अरुण जेटली

१४. औरंगाबाद: मुकुंदवाडीत दारुची दुकाने बंद करण्यासाठी महिलांची सह्यांची मोहीम

१५. अवैध धंदे आणि लाचखोरी प्रकरणी २ पोलीस अधिकारी आणि ६ पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित

१६. चौकीदार चोर नही चौकन्ना है – पंतप्रधान मोदी

१७. जालना : रावसाहेब दानवे-अर्जुन खोतकर यांच्यातील वाद मिटवण्याचे प्रयत्न; उद्या मंत्री सुभाष देशमुख दोघांची भेट घेणार

2 thoughts on “News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या…

Comments are closed.