Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वंचितांसाठी औरंगाबादेतून लोकसभा लढण्याचा न्या. कोळसे पाटलांचा निर्धार

Spread the love

आघाडीने उमेदवार देऊन ध्रुवीकरण करू नये – न्या बी जी कोळसे पाटील

वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या घोषणेला मान देऊन, सर्व वंचितांना सोबत घेऊन आपण औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढणार असल्याचा निर्धार निवृत्त न्या. बी जी कोळसे पाटील यांनी “महानायक ऑनलाईन”शी केला आहे .
न्या. बी जी कोळसे पाटील पुढे म्हणाले ले कि , धर्मांध-संविधान विरोधी शक्तींना घालविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेचा काँग्रेस व आघाडीने विचार करावा तसेच संविधानवादी आणि संघविरोधी इतर सर्व समविचारी पक्षांनी मताचे विभाजन गरजेचे आहे.जे सोबत येतील त्यांच्या सोबत व जे येणार नाही त्यांच्या शिवाय लढायला संविधान प्रेमी सैनिकांना सज्ज होण्याचे आवाहन त्यांनी केले असून शेतकरी-युवक-बहुजन विरोधी धर्मांध शक्ती जाती जाती मध्ये तेढ निर्माण करून नवपेशवाई आणून संविधान उध्वस्त करीत असताना मराठा-मुस्लिम-दलित-आदिवासी-ओबीसी व अल्पसंख्याक बहुजन घटकांनी एकत्रित येणे गरजेचे आहे.
दलित मुस्लिमांवर होत असलेला अत्याचार, बोगस कर्जमाफी, पीकविमा भ्रष्टाचार, उध्वस्त झालेली कायदा व्यवस्था, महागलेले शिक्षण व आरोग्य, वाढत असलेली बेरोजगारी, मराठा-मुस्लिम-धनगर- वाणी आरक्षणाचा पडलेला मुडदा, शिवराय-भीमरायांचे स्मारक,महागाई, बोगस योजना, औरंगाबाद मधील दहशत व गुंडशाही अशा अनेक मुद्द्यांवर ही निवडणूक लढविणार असून सर्व धर्मनिरपेक्ष, संविधानप्रेमी पक्षांनी ऍड . प्रकाश आंबेडकर यांनी परभणी येथील सभेत व्यक्त केलेल्या अपेक्षेप्रमाणे उमेदवार देऊन मत विभाजन करून धर्मांध शक्तींना मदत करू नये असे मतही न्या. बी जी कोळसे पाटील यांनी व्यक्त केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!