Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पाकसोबत क्रिकेट नाही : राजीव शुक्ला

Spread the love

केंद्र सरकारच्या मंजुरीशिवाय पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याबाबत कोणतेही पाऊल उचलले जाणार नाही, असे आज आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले. वर्ल्डकपमध्ये भारत पाकिस्तानसोबत खेळणार का, असे विचारले असता वर्ल्डकपला अजून अवकाश असून योग्यवेळी याबाबत निर्णय घेतला जाईल, असे शुक्ला यांनी स्पष्ट केले.
पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून भारत-पाकिस्तानमधील संबंध विकोपाला गेले आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्ला यांना विचारले असता पाकिस्तानसोबत कोणतीही उभयपक्षी मालिका न खेळण्याबाबतच्या निर्णयावर आम्ही कायम असल्याचे शुक्ला यांनी नमूद केले.
दोन देशांमधील संबंध आणि खेळ या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरी दहशतवादाला खतपाणी घालण्याचे काम कुणी करत असेल तर त्याचा निश्चितच खेळावरही परिणाम होतो, असे शुक्ला म्हणाले. पाकिस्तानसोबत सरकारच्या परवानगीशिवाय खेळायचे नाही, हे आमचे धोरण असून यात तसूभरही बदल झालेला नाही, असे त्यांनी पुढे स्पष्ट केले. आगामी वर्ल्डकपमध्ये भारत पाकिस्तानसोबत खेळणार का, असे विचारले असता, वर्ल्डकपला अजून बराच अवकाश असून या प्रश्नाचे उत्तर मी आता तुम्हाला देऊ शकत नाही. काय घडामोडी घडतात ते आम्ही आधी पाहणार, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्डकप सुरू होत असून वेळापत्रकानुसार १६ जून रोजी मँचेस्टर येथे भारत-पाकिस्तान सामना आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!