Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दहशतवादविरोधी कारवाई : अमेरिकेचा पूर्णपणे पाठिंबा

Spread the love

स्वसंरक्षणार्थ भारत जी दहशतवादविरोधी कारवाई करेल त्याला अमेरिकेचा पूर्णपणे पाठिंबा आहे अशी भूमिका अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी भारताला कळवली आहे. याप्रसंगी अमेरिका भारतासोबत असून जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्यासाठीही अमेरिका प्रयत्न करणार आहे.
पुलवामाच्या घटनेनंतर बोल्टन यांनी शुक्रवारी सकाळी डोवाल यांना फोन करून सांत्वना व्यक्त केली. तसंच दहशतवादाविरोधात भारताची पुढील रणनीती काय असेल याबद्दल चर्चाही केली. आत्मसंरक्षणार्थ भारताने दहशतवाद्यांवर कारवाई केल्यास अमेरिका त्याला पाठिंबा देईल, असंही त्यांनी सांगितलं. जैश-ए-मोहम्मदची सगळी सूत्रं पाकिस्तानातून हलवली जातात. तेव्हा त्यांचे पाकिस्तानातील अस्तित्व संपवण्यासाठी लागेल ती मदत करण्यास तयार असल्याची ग्वाही देखील अमेरिकेने दिली आहे.
एकीकडे भारताला मदत करण्यास तयार असतानाच दुसरीकडे पाकिस्तनानने दहशतवाद संपवावा अशी सक्त ताकीदच परराष्ट्र सचिव माइक पॉम्पिओ यांनी पाकिस्तानला दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!