न्या.कोळसे पाटील वंचित आघाडीचे उमेदवार : प्रकाश आंबेडकर

Advertisements
Advertisements
Spread the love

न्या. कोळसे पाटील औरंगाबादमधून वंचित आघाडीचे उमेदवार

मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती आणि लोकशासन आंदोलन पार्टीचे अध्यक्ष बी जी कोऴसे पाटील हे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज परभणीत करुन काॅंग्रेस-राष्ट्रवादीसह भाजप-सेनेलाही दणका दिला आहे. कोळसे पाटील हे निवृत्ती घेतल्यापासून परिवर्तनवादी चळवळीशी संबंधित आहेत.
बी जी कोऴसे पाटील यांनी २०१४ मध्ये नगर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. आता ते वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून औरंगाबादेत लढणार आहेत. औरंगाबादमध्ये एमआयएमचा आमदार आहे. तसेच वंचित आघाडीची ताकद वाढलेली आहे.
मा. न्या. कोळसे पाटील यांची परिवर्तनवादी विचारवंत म्हणून ख्याती आहे. महाराष्ट्रातील तरुण मतदार त्यांचा मोठा चाहता आहे त्यामुळे त्यांनी ही उमेदवारी स्वीकारल्यास औरंगाबादची लढत चांगलीच चुरशीची होऊ शकते.

Advertisements

आपलं सरकार