Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

‘जैश’ने केला हल्ला : जारी केला व्हिडीओ

Spread the love

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आदिल अहमद या दहशतवाद्याने हा हल्ला घडवून आणल्याची प्राथमिक माहिती आहे. आदिल हा पुलवामातील काकापोरा येथील असून २०१८ मध्ये तो जैशमध्ये सामील झाला होता, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सर्व जखमी जवानांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी या हल्ल्याचा तपास सुरू केला असून घटनास्थळाची पाहणी करण्यात आल्याचे सीआरपीएफचे महानिरीक्षक (ऑपरेशन्स) झुल्फिकार हसन यांनी सांगितले.
सीआरपीएफचा ताफा जम्मूहून श्रीनगरकडे जात असताना अवंतीपुरातील गोरीपोरा येथे या ताफ्याला लक्ष्य करण्यात आलं. ताफ्यात ७० वाहनं होती तर २ हजार ५०० जवान व अधिकारी होते. या ताफ्यात स्फोटकांनी भरलेलं वाहन घुसवून हा स्फोट घडवून आणण्यात आला, अशीही माहिती पुढे आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ताफ्यातील दोन बसेसना लक्ष्य करण्यात आल्याचं वृत्त दिलं आहे. गोळीबाराचाही आवाज ऐकू आल्याचं वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
जम्मू-काश्मीर: शोपियानमध्ये दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न सुरक्षा दलाच्या जवानांनी हाणून पाडला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीदांना वाहिली आदरांजली
पंतप्रधान मोदींसोबत नेपाळच्या पंतप्रधानांनी दूरध्वनींवरुन केली चर्चा; दहशतवादी हल्ल्याबाबत शोक व्यक्त केला
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह उद्या श्रीनगरमध्ये जाणार
जवानांवर झालेला दहशतवादी हल्ला भ्याड. दहशतवाद्यांना धडा शिकवणार: अरुण जेटली

आपलं सरकार

Click to listen highlighted text!