Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुकाबला मुझसे नही राहुल से है : प्रियांका

Spread the love

माझ्याशी नव्हे तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींशी पतंप्रधान नरेंद्र मोदींचा सामना होणार आहे, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे स्पष्ट केले.
जयपूरहून दिल्लीत परतल्यानंतर प्रियंका गांधी यांनी विविध लोकसभा क्षेत्रातील पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. सुमारे १६ तास चाललेल्या या बैठकांनंतर बुधवारी पहाटे पाच वाजता माध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. यावेळी प्रियंकांना विचारले गेले की, त्यांचा सामना पंतप्रधान मोदींशी आहे का? यावर त्यांनी उत्तर दिले की, आपल्याशी नव्हे तर राहुल गांधींशी त्यांचा सामना होणार आहे. राहुल त्यांची लढाई लढत आहेत.
पती रॉबर्ट वढेरा यांच्या ईडीकडून होत असलेल्या चौकशीबाबतही प्रियंकांनी आपली भुमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, या गोष्टी सुरुच राहतील मात्र, मी माझे काम सुरुच ठेवणार आहे. मला यामुळे काहीच फरक पडत नाही. सध्या रॉबर्ट वढेरा यांची ईडीकडून सातत्याने चौकशी सुरु आहे. दिल्लीत ईडीच्या पथकाने त्यांची तीन दिवस सलग चौकशी केली. मंगळवारी त्यांची जयपूरमध्ये चौकशी करण्यात आली, यावेळी प्रियंका त्यांच्यासोबत होत्या.
पक्ष कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीबाबत प्रियंका म्हणाल्या, संघटनेत बऱ्याच बदलाची गरज मला वाटते आहे. संघटनेच्याबाबत मी सध्या शिकत आहे. मला जनतेचे म्हणणे जाणून घ्यायचे आहे. सध्या निवडणुका कशा जिंकल्या जाव्यात यावर आमची चर्चा होत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!