Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राहुल गांधी यांचे आरोप निर्लज्जपणाचे : भाजप

Spread the love

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल कराराबाबत केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे सांगत भारतीय जनता पक्षाने राहुल यांच्यावर पलटवार केला आहे. राहुल यांनी केलेले आरोप निर्लज्जपणाचे आणि खोटे असून राहुल हे प्रतिस्पर्धी एअरक्राफ्ट कंपन्यांसाठी लॉबिंग करण्याचे काम करतात असा प्रत्यारोप केंद्रीय मंत्री
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल कराराबाबत केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे सांगत भारतीय जनता पक्षाने राहुल यांच्यावर पलटवार केला आहे. राहुल यांनी केलेले आरोप निर्लज्जपणाचे आणि खोटे असून राहुल हे प्रतिस्पर्धी एअरक्राफ्ट कंपन्यांसाठी लॉबिंग करण्याचे काम करतात असा प्रत्यारोप केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रामाणिक आणि देशभक्तीचे उदाहरण असलेले पंतप्रधान मोदी यांच्याबाबत असभ्य भाषेचा वापर केला. याचे खरे उत्तर तर या देशाची जनताच देईल असे रविशंकर म्हणाले. राहुल गांधी यांचा खोटेपणा आपण उघडा पाडू असा संकल्पही प्रसाद यांनी सोडला आहे. पंतप्रधान मोदी यांनी राफेल कराराची गोपनीयता भंग करत उद्योपती अनील अंबानी यांना या कराराची माहिती दिली, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला. शिवाय त्यांनी लिक झालेल्या ई-मेलचा आधार घेत पंतप्रधान मोदी यांनी गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केल्याचाही राहुल यांचा आरोप आहे.

राहुल गांधी यांना फ्रान्समधील एअरबस कंपनीच्या ई-मेलची माहिती कुठून मिळाली हे त्यांनी सांगावे, असे आवाहन रविशंकर प्रसाद यांनी राहुल यांना केले आहे. काँग्रेस प्रणित सरकारच्या काळात एअरबसद्वारे झालेला करार संशयाच्या भोवऱ्यात सापडला असल्याचेही ते म्हणाले. हा ई-मेल हॅलिकॉप्टरबाबत होता आणि या एअरबस कंपनीची तर दलालीबाबत चौकशी होत आहे. अशा कंपनीचा ई-मेल घेऊन राहुल फिरत आहेत असेही प्रसाद म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!