It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

गल्ली ते दिल्ली #NewsUpdates दिवसभरातील महत्वाच्या बातम्या ….

Spread the love

1.राज्यात सर्वत्र थंडीची लाट

2. पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजित विश्वास यांची गोळ्या झाडून हत्या
3. पुणेः काँग्रेसप्रणित महाआघाडी जिंकल्यास देशात पुन्हा जातीयवाद वाढेल, भाजप अध्यक्ष अमित शहांचे मत
4. नागपूर: आदिवासी समाजाने समृ्द्ध परंपरा व संस्कृती जोपासण्याचे काम केले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दोन दिवसीय आदिवासी महोत्सवाचा समारोप
5. नागपूर : केंद्र सरकारच्या १३ पॉईंट रोस्टरला नागपुरातून विरोध; २०० पॉईंट रोस्टर लागू करण्यासाठी अध्यादेश काढण्याची रिपाइंची मागणी
6. औरंगाबाद: आणखी ७ सिटीबस सोमवारपासून धावणार; सिटी बसची संख्या ३० होणार, फेब्रुवारी अखेरपर्यंत ४३ बस रस्त्यावर धावणार
7. नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री अरुण जेटली उपचारानंतर भारतात परतले

8. मुंबई: सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांच्या घरी सीआयएसएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या

9. पुणेः बेरोजगारीच्या मुद्द्यावरून एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी भाजप अध्यक्ष अमित शहांना काळे झेंडे दाखवले : २० ते २५ तरुण पोलिसांच्या ताब्यात
10. भाजप अध्यक्ष अमित शहा गोव्यात पोहोचले, मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची घेतली भेट
11. माझे वय झाल्याने मी माढातुन निवडणूक लढवू नये असे सुचवू पाहणाऱ्या भाजप नेत्यांनी माझ्या तब्येतीची काळजी करु नये
– शरद पवार, अध्यक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस
12. पोलीस प्रशासनाकडून आंदोलनादरम्यान झालेल्या दडपशाहीच्या प्रकारची चौकशी करणार: अर्जुन खोतकर
13. सोलापूरः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची चर्चा, शरद पवार सांगोल्यातील कार्यक्रमात दाखल. माढाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटीलही कार्यक्रमाला उपस्थित
14. औरंगाबाद: पैठण तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा सातत्याने पाठलाग करणारा, प्रेमपत्र पाठवून छेडछाड काढणारा आरोपी राम अशोक झिरपे याला एक वर्ष सक्तमजुरी व चार हजार रुपये दंडाची शिक्षा