Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

खा. असदुद्दीन ओवैसी यांचे बंधू अक्रबुद्दीनची प्रकृती गंभीर, लंडनमध्ये उपचार

Advertisements
Advertisements
Spread the love

एमआयआमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे छोटे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांची प्रकृती बिघडली असून गंभीर आहे. लंडनमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अजून बिघडली आहे. दरम्यान असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या समर्थकांना बंधू अकबरुद्दीन लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करा असं आवाहन केलं आहे.

Advertisements

अकबरुद्दीन ओवेसी हैदराबादमधील चंद्रयानगुट्टा येथील आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीपासूनच त्यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरु आहेत. २०११ रोजी एका घटनेत त्यांना गोळी लागली होती तसंच चाकूने जखमी झाले होते. यासाठीच लंडनमध्ये ते उपचार करुन घेत आहेत. तीन दिवसांपुर्वी अकबरुद्दीन यांना पुन्हा एकदा उलट्या होण्यास सुरुवात झाली आणि पोटात दुखू लागलं. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Advertisements
Advertisements

दुसरीकडे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी अकबरुद्दीन ओवेसी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून जगमोहन रेड्डी यांनी अकबरुद्दीन ओवेसी यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत असल्याचं म्हटलं आहे.

ईदच्या निमित्ताने आपल्या समर्थकांशी संवाद साधताना असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं होतं की, ‘मी तुम्हा सर्वांना ईदच्या शुभेच्छा देतो. तुम्ही सर्वांनी अकबरुद्दीन यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करावी असं आवाहन करतो. ते उपचारासाठी गेले आहेत. त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली असल्याची माहिती मिळाली आहे. अल्ला त्यांना सुरक्षित ठेवेल अशी अपेक्षा आहे’.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!