हवाई दलाच्या बेपत्ता विमानाचे अवशेष सापडले
Advertisements
Advertisements
भारतीय हवाई दलाचे बेपत्ता विमान एएन-३२ चे अवशेष दिसल्याची माहिती समोर आली आहे. अरुणाचल प्रदेशमधील सियांग जिल्ह्यात हे अवशेष दिसल्यामुळे गेले अनेक दिवस सुरू असलेल्या शोधमोहिमेला वेग आला आहे. भारतीय हवाई दलाकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.
Advertisements
आसाम येथून ३ जून रोजी एएन-३२ या विमानाने १३ प्रवाशांसह उड्डाण केले होते. यानंतर या विमानाची असलेला संपर्क तुटला होता. भारतीय हवाई दलाने शोधमोहिम सुरू केली होती. मात्र, खराब हवामानामुळे ठोस गोष्ट हाती लागत नव्हती. अखेर हवाई दलाचे हेलिकॉप्टर एमआय-१७ ला विमानाच्या अवशेष दिसले. सदर हेलिकॉप्टर बेपत्ता विमानाचा शोध घेत होते.
Advertisements
Advertisements
