बारामतीकरांच्या पाण्याच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांचे ” फाशी आंदोलन “

Advertisements
Advertisements
Spread the love

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज शुक्रवारी मुंबई येथे बैठक होणार आहे. पवार यांनी दुष्काळी सांगोला तालुक्याचे हक्काचे पाणीबारामतीकडे वळविले आहे. आज होणा-या मुंबई येथील बैठकीत बारामतीचेपाणी जैसे थे राहावे, असा निर्णय झाल्यास सांगोला तालुक्यातील भाजपाचे तालुकाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे असंख्य कार्यकर्ते शिवाजी चौक सांगोला येथे गळफास घेणार आहेत.

Advertisements

बारामतीचे जास्तीचे पाणी घेऊ देणार नसल्याचे श्रीकांतदादा देशमुख यांनी सांगितले. त्यासाठी शिवाजी चौक येथील चिंचेच्या झाडास दोर लावून फास बांधण्यात आले आहेत, जर बैठकीत निर्णय सांगोलकरांच्या विरोधात गेल्यास अनेक कार्यकर्ते भर चौकात गळफास घेणार असल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!