Rajstan : मंदिरात प्रवेश करणाऱ्या अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण

Advertisements
Advertisements
Spread the love

राज्यस्थानमधल्या पाली जिल्ह्यात पुरोगामी भारताला काळिमा फासणारी घटना घडली आहे. दलित समाजातील एका अल्पवयीन मुलानं मंदिरात प्रवेश केल्यानं त्याला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला आहे. पाली जिल्ह्यातील जैतारणमधल्या रासठाणा भागातल्या धनेरिया गावात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन दलित मुलानं मंदिरात प्रवेश केल्यानं संतप्त जमावानं त्याचे हात-पाय बांधून त्याला रस्त्याच्या मधोमध उभे  करून काठीने बेदम मारहाण केली आहे. मारहाण करणाऱ्या तरुणांकडील भगव्या रंगाच्या उपरण्यावरुन ते हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असावेत, असे सांगितले जाते.

Advertisements

व्हिडीओ व्हायरल होताच आरोपींमधल्या एकानं पीडित अल्पवयीन मुलाच्या विरोधात मुलीची छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्या अल्पवयीन दलित मुलालाच कोठडीत पाठवले . मंगळवारी ४ जून रोजी पीडित अल्पवयीन दलित मुलाच्या मामांनी आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला. आरोपी हे वजनदार कुटुंबातील असल्यानं पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नसल्याचा आरोप पीडित मुलाच्या मामानं केला आहे.

Advertisements
Advertisements

पीडित अल्पवयीन दलित मुलगा हात जोडून दयेची भीक मागत असूनही त्या जमावानं त्याला निर्दयीपणे मारहाण केली आहे. तो मुलगा हात जोडून सांगत होता की, पुन्हा कधीही मंदिरात जाणार नाही. तरीही जमावानं त्याला चोपलं आहे. कडाक्याच्या उन्हातही जमाव त्याला बेदम मारहाण करत होता. या घटनेचा एक व्हिडीओसुद्धा बनवण्यात आला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. १ जून रोजी या घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे.

पाली जिल्ह्यात अल्पवयीन मुलाला काही तरुणांनी अमानूष मारहाण केली. हिंदू मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने त्याला मारहाण करण्यात आली, असे सांगितले जाते. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनेची दखल घेत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. “या प्रकरणी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून मुलाची रवानगी बाल वसतीगृहात करण्यात आली आहे”, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. स्थानिक माध्यमांमधील वृत्तानुसार दलित मुलाने हिंदू मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता आणि यातूनच ही मारहाण करण्यात आली.

व्हिडिओ व्हायरल
दलित मुलाला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत काही तरुण दलित मुलाला दोरीने बांधून त्याला काठीने मारहाण करताना दिसत आहे. मारहाणी दरम्यान त्याला शिवीगाळही केली जात आहे. पीडित मुलगा मारहाण करणाऱ्यांना विनवणी करताना दिसत असून यानंतरही त्या तरुणांनी मारहाण सुरूच ठेवली. पाली जिल्ह्यातील धनेरिया गावात ही घटना घडली आहे. या व्हिडिओवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!