Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कोल्हापूरात गेम खेळताना मोबाईल स्फोट, तरुणाचा डोळा निकामी

Advertisements
Advertisements
Spread the love

कोल्हापूरमध्ये एक  धक्कादायक घटना घडली असून या घटनेत गेम खेळत असताना अचानक मोबाईलचा स्फोट झाल्याने एका तरुणाला आपला डोळा गमावावा लागला आहे. अमोल पाटील (१६) असे या जखमी मुलाचे नाव आहे. कोल्हापूरमधील कागल तालुक्यातील उंदरवाडी परिसरात अमोल पाटील राहतो. अमोलचे आई-वडिल शेतात गेल्याने तो घरी मोबाईलवर गेम खेळत होता. गेम खेळत असताना मोबाईल गरम होऊन त्याचा स्फोट झाला. या स्फोटामुळे त्याच्या हाताला जखम झाली असून, मोबाईलचा एक तुकडा अमोलच्या डोळ्यात घुसला.

Advertisements

या प्रकरणानंतर अमोलला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आला. मात्र डॉक्टरांनी त्याचा एक डोळा निकामी झाल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान या घटनेमुळे परिसरात अनेकांना धक्का बसला. औरंगाबाद जिल्ह्यातही अशाच एका घटनेत दोन मुले मोबाईलशी  खेळताना जखमी झाले होते .

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!