…आणि पतीचे मुंडके घेऊन गुणेश्वरी गेली थेट पोलीस ठाण्यात !!

Advertisements
Advertisements
Spread the love

पतीच्या नेहमीच्या अत्याचाराला कंटाळून पत्नीने पतीचे मुंडकेच उडवले. धक्कादायक म्हणजे तेच मुंडके घेऊन ती पोलीस स्थानकात पोचली आणि आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आसामच्यालखीमपुरमधील ही घटना असून पत्नीचे नाव गुनेश्वरी बरकाटकी (४८)  आहे. तर मृत पतीचे नाव मुधिराम (५५) असं आहे.

Advertisements

गेली अनेक वर्षे पती आपल्याला नाहक त्रास देत होता असे आरोपी पत्नी गुनेश्वरी यांनी पोलिसांना सांगितले. अनेकवेळा त्याने कुर्‍हाडीने मारहाण करून जखमी केले. त्याला सोडून जाण्याचा मी खूप विचार केला. मात्र, मुलांमुळे मी गप्प बसले होते. परंतु ही गोष्ट हाताबाहेर गेली होती. आता जर मी त्याला मारले नसते तर त्याने माझा खून केला असता असेही पुढे गुनेश्वरी यांनी पोलिसांना माहिती दिली. गुनेश्वरी हिला पाच मुले आहेत. गुरुवारी तिने कुर्‍हाड्याने आपल्या पतीची हत्या केली आणि पाच किलोमीटरवर असलेल्या पोलीस स्थानकात एका प्लास्टिकच्या पिशवीत पतीचे मुंडके भरून घेऊन गेली. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Advertisements
Advertisements

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!