Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लहान शहरांच्‍या विकासावरही भर – मुख्‍यमंत्री

Advertisements
Advertisements
Spread the love

केंद्र सरकारच्‍या मदतीने छोट्या शहरातील विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्‍ध करुन देण्‍यात आला आहे. बालाजी नगरी म्‍हणून ओळखल्‍या जाणाऱ्या देऊळगावराजा शहरातही अनेक विकासाची कामे करण्‍यात आली असून या शहराच्‍या सर्वांगिण विकासासाठी यापुढेही निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. मागील चार वर्षांत राज्‍य शासनाने मोठ्या शहरांबरोबरच लहान शहरांच्‍या विकासावरही प्रामुख्‍याने भर दिला आहे, असे प्रतिपादन मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देऊळगांव राजा येथे केले.
देऊळगावराजा येथील नगर परिषदेच्‍या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याहस्‍ते आज करण्यात आले. याप्रसंगी पर्यटन मंत्री जयकुमार रावल, महसूल राज्‍यमंत्री संजय राठोड, नगर विकास राज्‍यमंत्री डॉ. रणजीत पाटील, खासदार प्रतापराव जाधव, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा उमा तायडे, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार चैनसुख संचेती, आमदार सर्वश्री डॉ संजय कुटे, डॉ. संजय रायमुलकर, डॉ. शशिकांत खेडेकर, देऊळगावराजा नगर परिषदेच्‍या अध्‍यक्षा सुनिता शिंदे, उपाध्‍यक्ष प्रवीण झोरे आदींसह नगर परिषद पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!