एमके स्टॅलिन यांनी भाजपचा प्रस्ताव धुडकावला म्हणाले , “तत्त्वांपासून दूर जाणार नाही, अजिबात तडजोड करणार नाही”,भाजपाचे टेन्शन वाढले

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली : “मतदारसंघ पुनर्रचनेच्या संभाव्य दुष्परिणामांबाबत भारतात सर्वप्रथम आवाज उठवणारा पक्ष डीएमके हाच होता. सत्तेसाठी आपल्या तत्त्वांना तिलांजली देणाऱ्या निर्लज्ज आणि कृतघ्न लोकांनी हे समजून घेतले पाहिजे”, असे म्हणत तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबद्दल भूमिका मांडली. स्टॅलिन यांनी काही मागण्यांचा उल्लेख केला असून, तामिळनाडूच्या हितांशी आणि आपल्या तत्त्वांशी अजिबात तडजोड करणार नाही, असे म्हटले आहे.

Advertisements

भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडण्याच्या हालचाली सुरू केल्या असून, एमके स्टॅलिन यांचा डीएमके या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर एमके स्टॅलिन यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे.

Advertisements
Advertisements

एमके स्टॅलिन म्हणाले की, “मतदारसंघ पुनर्रचनेमुळे होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामांबाबत भारतात सर्वप्रथम आवाज उठवणारा पक्ष डीएमके हाच होता. न्याय्य मतदारसंघ पुनर्रचनेची मागणी करण्यासाठी देशभरातील नेत्यांना एकत्र आणणारी पहिली बैठकही चेन्नईतच पार पडली होती.”

स्टॅलिन यांच्या मागण्या काय आहेत?

“तमिळनाडू विधानसभेत मंजूर झालेला ठराव आणि न्याय्य मतदारसंघ पुनर्रचनेसाठी स्थापन झालेल्या संयुक्त कृती समितीच्या बैठकीत संमत झालेल्या ठरावांना अनुसरून आमच्या ठाम मागण्या होत्या”, असे स्टॅलिन म्हणाले.

“लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढवण्यात आली, तरी कोणत्याही परिस्थितीत तमिळनाडूचा सध्याचा ७.१८ टक्के वाटा कमी होता कामा नये! १९७१ च्या जनगणनेच्या आधारे निश्चित केलेले आणि यापूर्वी गोठवलेले राज्यांमधील संसदीय प्रतिनिधित्वाचे विद्यमान प्रमाण पुढील २५ वर्षांसाठी कायम ठेवले पाहिजे!”, असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.

स्टॅलिन म्हणाले, तडजोड करणाऱ्याचा प्रश्नच येत नाही

“डीएमके आजही या दोन्ही भूमिकांवर ठाम आहे आणि पुढेही राहील. या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही आणि तडजोडीचा तर प्रश्नच उद्भवत नाही! प्रसारमाध्यमांमध्ये पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि विश्वासघातकी लोकांची कुणकुण आमची भूमिका कोणत्याही प्रकारे डळमळीत करू शकणार नाही”, असेही स्टॅलिन म्हणाले आहेत.

“सत्तेतील पदांसाठी आपल्या तत्त्वांना तिलांजली देणाऱ्या निर्लज्ज आणि कृतघ्न लोकांनी हे समजून घेतले पाहिजे. डीएमके तमिळनाडूच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही, आणि आपल्या तत्त्वांना कधीही तिलांजली देणार नाही”, असेही स्टॅलिन यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

आपलं सरकार

Click to listen highlighted text!