शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; डिहायड्रेशनमुळे प्रकृती बिघडली, सुप्रिया सुळे यांची माहिती

Advertisements
Advertisements
Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने (डिहायड्रेशन) त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याची माहिती त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात चिंता व्यक्त केली जात आहे.

Advertisements

सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून दिली माहिती

शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच सुप्रिया सुळे यांनी सुरू असलेली राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची बैठक सोडून तातडीने रुग्णालयाकडे धाव घेतली.

Advertisements
Advertisements

शरद पवार यांना रुग्णालयात का दाखल केले?

त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत वडिलांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. ‘बाबांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना डिहायड्रेशन झाल्याचे दिसत आहे. आता त्यांनी काम कमी करावे आणि प्रवासही कमी करावा लागेल. पण बाबा कोणाचेच ऐकत नाहीत. त्यांना कामावर खूप प्रेम आहे,’ अशा भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या. तसेच काळजी व्यक्त करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.

यापूर्वीही रुग्णालयात करण्यात आले होते दाखल

दरम्यान, ८५ वर्षीय शरद पवार यांना यापूर्वी ५ नोव्हेंबर रोजीही नियमित वैद्यकीय तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याआधी पुण्यातील एका मल्टिस्पेशालिटी आरोग्य केंद्रातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

यापूर्वी शरद पवार यांना श्वसनाचा त्रास आणि छातीच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी पत्रकारांना दिली होती. त्यांना २ नोव्हेंबर रोजी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते.

सध्या डिहायड्रेशनमुळे त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत वैद्यकीय अपडेटची प्रतीक्षा आहे.

 

शरद पवार यांची प्रकृती बिघडली, पुन्हा ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल…

Leave a Reply

आपलं सरकार

Click to listen highlighted text!