छगन भुजबळ यांनी स्पष्ट सांगितले शरद पवार काय करू शकतात ? राजकीय वर्तुळात खळबळ

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे NDA मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा सध्या माध्यमांमध्ये सुरू आहेत. यावर मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये मोठे विधान केले आहे. “शरद पवार प्रत्यक्ष NDA मध्ये जातील असे मला वाटत नाही, मात्र एखाद्या विशिष्ट मुद्द्यावर किंवा मतदारसंघ पुनर्रचनेच्या प्रश्नावर त्यांना योग्य वाटल्यास ते NDA ला बाहेरून पाठिंबा देऊ शकतात,” असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले. नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील दुष्काळ, कोयना पाणीप्रश्न, समता पुरस्कार आणि गोदावरी प्रदूषणासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

Advertisements

भुजबळ म्हणाले की, यापूर्वी राज्यात ३३४ तालुके दुष्काळग्रस्त होते, मात्र आता ही संख्या वाढत आहे. नाशिक तालुक्यातील काही महसूल मंडळांमध्ये परिस्थिती गंभीर असून, जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रस्ताव पुढे पाठवण्यात आला आहे. उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळग्रस्त तालुक्यांतील केशरी शिधापत्रिकाधारकांना मोफत अन्नधान्य देण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच जनावरांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था करणे, चारा खरेदी आणि मनरेगाच्या माध्यमातून पाणलोट क्षेत्रातील कामे हाती घेऊन रोजगार उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. कालच येवला येथे मका आणि ज्वारीच्या बियाण्यांचे वाटप केल्याचेही ते म्हणाले.

Advertisements
Advertisements

जावेद अख्तर यांना यंदाचा समता पुरस्कार

महात्मा फुले यांच्या नावाने सामाजिक क्षेत्रात व गोरगरीबांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी समता पुरस्कार दिला जातो. यंदा ज्येष्ठ लेखक आणि कवी जावेद अख्तर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, २८ नोव्हेंबर रोजी पुण्यात हा सोहळा पार पडणार असल्याचे भुजबळ यांनी जाहीर केले.

विरोधकांचे काम आरोप करणे आहे. दिवाळीत नागरिकांना अडचण येऊ नये म्हणून पाच हजार रुपयांचे अग्रीम देण्यात आले असून, दुष्काळाचा आढावा घेऊन केंद्र व राज्य सरकारकडून मदत दिली जाईल. तसेच, व्हायरल पोस्टबाबत आपल्याला माहिती नसून, ज्याने चुकीचे कृत्य केले असेल त्याला कायद्यानुसार शिक्षा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

आपलं सरकार

Click to listen highlighted text!