Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नाशिकमधील TCS युनिटचे ऑपरेशन्स अचानक बंद; ७ जणांना अटक, ९ FIR दाखल; SITकडून सखोल तपास सुरू, हजारो कर्मचाऱ्यांवर परिणाम

Spread the love

Tata Consultancy Services (TCS) ने नाशिकमधील आपल्या युनिटचे ऑपरेशन्स अचानक स्थगित केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण आणि जबरदस्ती धर्मांतराच्या गंभीर आरोपांनंतर कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे. सर्व कर्मचाऱ्यांना पुढील सूचना येईपर्यंत कॅम्पसमध्ये न येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गंभीर आरोपांमुळे तातडीची कारवाई

कंपनीच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले की, लैंगिक अत्याचाराबाबत TCSची ‘झिरो टॉलरन्स’ पॉलिसी आहे. आरोप समोर येताच संबंधित कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले असून, पोलिस तपासात पूर्ण सहकार्य केले जात आहे.

या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ७ जणांना अटक केली असून, त्यामध्ये एका HR मॅनेजरचाही समावेश आहे. एकूण ९ FIR नोंदवण्यात आल्या आहेत. काही अधिकाऱ्यांनी महिला कर्मचाऱ्यांवर मानसिक दबाव टाकत धर्मांतरासाठी भाग पाडल्याचे आरोप आहेत.

‘मास्टरमाइंड’चा शोध सुरू

पोलिस सूत्रांनुसार, तौसिफ अत्तार आणि निदा खान यांना या संपूर्ण प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानले जात आहे. २०२२ पासून या संदर्भातील तक्रारी HR विभागाकडे येत होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप आहे.

या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (SIT) करत असून, ७० पेक्षा अधिक अंतर्गत ईमेल्स, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर डिजिटल पुरावे तपासले जात आहेत. आरोपींच्या बँक खात्यांचीही चौकशी सुरू असून, या प्रकरणामागे कोणतेही अवैध आर्थिक जाळे आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

८ महिलांच्या तक्रारीनंतर प्रकरण उघड

या संपूर्ण प्रकरणाचा भंडाफोड ८ महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर झाला. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मानसिक आणि लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते. मात्र, HR विभागाने त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिक युनिटमध्ये हजारो कर्मचारी कार्यरत होते. ऑपरेशन्स बंद झाल्यामुळे त्यांच्या कामावर मोठा परिणाम झाला आहे. कंपनीकडून वर्क फ्रॉम होम किंवा इतर युनिटमध्ये बदली यांसारखे पर्याय विचाराधीन असल्याचे समजते.

या प्रकरणातील काही आरोपी फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. तपास पूर्ण होईपर्यंत निलंबित कर्मचाऱ्यांवर कारवाई कायम राहणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

पुण्यात सिनेस्टाईल अपहरण! ५० लाखांच्या वादातून कंत्राटदाराला कंटेनरमध्ये डांबून मारहाण

Leave a Reply

आपलं सरकार

Click to listen highlighted text!