Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चर्चेतली बातमी : खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

Spread the love

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. संसद भवनात सुप्रिया सुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाल्याची माहिती मिळत आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण या भेटीकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. राज्याच्या राजकारणासाठी ही मोठी बातमी आहे. प्राथमिक माहितीनुसार, आपल्या मतदारसंघातील वेगवेगळे प्रश्न, तथा राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न याबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट होती, असे सांगितले जात आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड घडामोडी घडत आहेत. आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी प्रत्येक पक्ष तयारीला लागला आहे. प्रत्येक पक्षाकडून यासाठी रणनीती आखली जात आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष या निवडणुकीत बघायला मिळण्याची शक्यता आहे. सत्ताधारी महायुतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष देखील आहे. तर राष्ट्रवादीचा दुसरा गट हा विरोधात आहे. सत्ताधारी गट आणि विरोधातील गट यांच्यात नेहमी टीका टीप्पणी होत असते. सुप्रिया सुळे आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीत याबाबत चर्चा होते का? ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे.

काही महिन्यांपूर्वी मुंबईत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्लीत पार पडलं होतं. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर एकत्र आलेले बघायला मिळाले होते. त्यावेळी मोदींनी शरद पवार यांच्यासाठी बसायला खुर्ची ऑफर केली होती. तसेच त्यांनी शरद पवारांना पाणी देखील दिलं होतं. ते दृश्य पाहून अनेक जण भारावलं होतं. देशाच्या राजकीय संस्कृतीचं हे चांगलं दर्शन असल्याची भावना अनेकांनी त्यावेळी व्यक्त केली होती. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या भेटीत नरेंद्र मोदी शरद पवार यांचादेखील निरोप विचारु शकतात.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर केंद्र सरकारने काही खासदारांना विविध देशांमध्ये भारताची भूमिका मांडण्यासाठी पाठवलं होतं. यावेळी एक शिष्टमंडळ सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात विदेशात गेलं होतं. केंद्र सरकारने सुप्रिया सुळे यांना महत्त्वाची भूमिका दिली होती. याबाबतही या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!