Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी : कमल हसन

Advertisements
Advertisements
Spread the love

‘महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता,’ असं विधान दाक्षिणात्य सुपरस्टार आणि मक्कल निधी मियाम या पक्षाचे प्रमुख कमल हासन यांनी केलं आहे. कमल हासन यांच्या या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.  चेन्नईतील अरिवाकुरुची विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना कमल हासन यांनी हे वक्तव्य केलं. नथुराम गोडसे हा महात्मा गांधी यांची हत्या करणारा स्वतंत्र भारतातील पहिला अतिरेकी होता आणि तो हिंदू होता. इथं मुसलमानांची लोकसंख्या अधिक आहे म्हणून मी हे बोलत नाही. तर महात्मा गांधीच्या पुतळ्याखाली उभा असल्याने मी हे बोलत आहे, असं हासन म्हणाले.

Advertisements

गांधीजींची हत्या झाली. त्याचा न्याय मागण्यासाठी मी इथे आलो आहे. मी सच्चा भारतीय आहे आणि देशात शांतता आणि समानता प्रस्थापित व्हावी हे कोणत्याही भारतीयाला वाटतं. माझाही तोच प्रयत्न आहे, असं सांगतानाच तिरंगा ध्वजच भारताचा राष्ट्रीय ध्वज राहिला पाहिजे, असंही ते म्हणाले.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!