Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Loksabha2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र

Advertisements
Advertisements
Spread the love

मुरैना : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “नरेंद्र मोदी पराभवाच्या भीतीमुळे थरथरत आहेत. म्हणून ते एकापाठोपाठ एक खोटे बोलत आहेत”  यावर आता मोदींनी पलटवार केला करताना  “राहुल गांधी यांना माझा अपमान करण्यात मजा येत आहे” असं म्हणत निशाणा साधला आहे.

मध्य प्रदेशातील मुरैना येथे जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी म्हणाले की  “मी पाहत आहे की, सोशल मीडिया आणि टीव्हीवर लोक म्हणत आहेत की अशी भाषा पंतप्रधानांसाठी चांगली नाही. देशाच्या पंतप्रधानांसाठी अशी भाषा का वापरली गेली, याचे काहींना दु:ख होते ” असं मोदींनी म्हटले  आहे.

Advertisements

राहुल गांधींचे नाव न घेता मोदी पुढे म्हणाले की, “ते नामदार आहेत, आम्ही कामगार आहोत हे तुम्हाला माहिती आहे. शतकानुशतके नामदार कामगारांवर अशीच शिवीगाळ करत आहेत. माझी विनंती आहे की या नामदारांना काहीही बोलू नका. आपण सहन करण्यासाठी जन्माला आलो आहोत. आपण सहन करू आणि भारत मातेची सेवाही करू.”

Advertisements
Advertisements

“आजकाल काँग्रेसच्या राजघराण्याचे राजपुत्र देशभरात मोठ्याने सांगत आहेत की, आता तुमच्या संपत्तीचा एक्स-रे केला जाईल. आपल्या माता-भगिनींकडे पवित्र स्त्रीधन आहे. काँग्रेस आपली व्होटबँक मजबूत करण्यासाठी ती जप्त करून वाटून घेण्याची जाहीर घोषणा करत आहे” असं ही नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!