Delhi MCD Election Results 2022 । आम आदमी पक्षाला बहुमत… आप कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु

Advertisements
Advertisements
Spread the love

(Delhi MCD Election Results 2022) दिल्ली महापालिकेच्या २५० जागांसाठी ४ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. तर आज (७ डिसेंबर) मतमोजणी पार पडत आहे. या निवडणुकीत २५० जागांसाठी एकूण १३४९ उमेदवार मैदानात होते. दिल्ली महापालिकेवर गेल्या १५ वर्षांपासून भाजपची सत्ता होती. मात्र यंदा दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाला बहुमत मिळाले आहे. यासोबतच दिल्ली महापालिकेवरील भाजपची दीड दशकाची सत्ता संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत मुख्य लढत आप, भाजप आणि काँग्रेसमध्येच होती.

Advertisements

दरम्यान, दिल्ली महापालिकेच्या २५० पैकी २३३ जागांचे निकाल (दुपारी २ वाजेपर्यंत) जाहीर करण्यात आला आहे. यात आम आदमी पक्षाला १२६ जागांवर विजय मिळाला असून भाजप ९७ जागांवर विजयी झाली आहे. काँग्रेसने ७ जागांवर विजय संपादन केला आहे. तर ३ अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. अजूनही १७ जागांचे निकाल येणे बाकी आहे. कलांमध्ये बहुमत मिळाल्यानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीमध्ये आपच्या कार्यालयाबाहेर जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. तर मुंबईतही आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे.

Advertisements
Advertisements

Parliament Winter Session। नवीन खासदारांना संधी द्या…


News Update on one click
https://www.mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!