Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नरेंद्र मोदी विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांसोबत भेदभाव करतात : केजरीवाल

Advertisements
Advertisements
Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांसोबत भेदभाव करतात. ते पाकिस्तानच्या पंतप्रधानांप्रमाणे वागतात, असा आरोप केजरीवाल यांनी केला. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज राजधानी नवी दिल्लीमध्ये एकदिवसीय उपोषण केले. यावेळी नायडू यांना पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांचे अनेक नेते पोहेचले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदा केजरीवाल यांनीही चंद्राबाबू नायडू यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. यावेळी बोलताना केजरीवाल म्हणाले, ”जेव्हा कुणी एका राज्याचा मुख्यमंत्री बनतो तेव्हा तो केवळा एका पक्षाचा मुख्यमंत्री नसतो तर तो संपूर्ण राज्याचा मुख्यमंत्री असतो. त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा पंतप्रधान बनता तेव्हा तुम्ही कुठल्या पक्षाचे नव्हे तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान असता. मात्र ज्याप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षाची सरकारे असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना अशी वागणूक देतात त्यावरून ते भारतातचे नव्हे तर पाकिस्तानचे पंतप्रधान वाटतात.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!