Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SanjayRautNewsUpdate : संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ …

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई  : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी  अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत  यांना मुंबई सत्र न्यायालयाने आणखी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे १९ सप्टेंबरपर्यंत त्यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. 

Advertisements

शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात ३१ जुलै रोजी ईडीनं अटक केली होती. ८ दिवसांच्या ईडी कोठडीनंतर त्यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ईडी कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले  होते. दरम्यान ईडीने  त्यांच्या कोठडीची मागणी केली नाही, त्यामुळे त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊतांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली होती.

Advertisements
Advertisements

दरम्यान आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांना घरचे  जेवण आणि औषधं पुरवण्याची मुभा न्यायालयाने  दिली  होती. आज पुन्हा त्यांना ५सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याशिवाय  त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही पत्राचाळ आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने  समन्स बजावले  होते. त्यांचीही चौकशी करण्यात आली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!