EntertainmentNewsUpdate : सिने अभिनेता संदीप पाठक यांच्या शिरोपेचात आणखी एक मानाचा तुरा …

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : प्रसिद्ध सिने , नाट्य आणि टीव्ही स्टार संदीप पाठक यांना जम्मू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरविण्यात आले आहे. राख या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. दरम्यानच्या काळात याच चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता.


‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या आपल्या नाटकांबरोबरच चित्रपट , वेबसिरीज मध्येही संदीप पथक यांची घोडदौड सुरु आहे. याशिवाय झी मराठी वरील ‘डान्स महाराष्ट्र डान्स’च्या लिटिल मास्टर्स या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारीही ते पार पडत आहेत. सध्या त्यांचा  ‘राख’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. अलीकडच्या अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतून ‘राख’ चित्रपटातील भूमिकेसाठी संदीप यांना गौरविण्यात आले आहे. आता जम्मू आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही संदीप पाठकने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावत आपल्या यशाची मालिका सुरुच ठेवली आहे. १५ देशांचे ५४ चित्रपट या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी निवडण्यात आले होते.

Advertisements

https://www.instagram.com/p/Ch1VFIeqFtj/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading

Advertisements
Advertisements

‘आपण केलेल्या कष्टाला जेव्हा कौतुकाची थाप मिळते. तो क्षण भाग्याचा असतो. हा पुरस्कार मला मिळाला असला तरी आमच्या संपूर्ण टीमचे हे श्रेय आहे. एक वेगळी कलाकृती सादर करण्याचा आमच्या टीमचा हा प्रयत्न यशस्वी झाला असून विविध महोत्सवांमध्ये घेतली जाणारी ‘राख’ चित्रपटाची दखल आम्हाला सुखावणारी असल्याचे संदीप पाठक याने सांगितले. ‘राख’ या चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश चव्हाण यांनी केलंय. लवकरच ‘राख’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!