Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ShivsenaNewsUpdate : कमाल झाली … !! “गेले ते बेन्टेक्स उरले, ते सोने..” म्हणणारे खासदारही शिंदेसेनेत …!!

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : ‘ गेले ते बेन्टेक्स उरले, ते सोने‘ अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर टीका करणारे शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनीही एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. दरम्यान शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व आता शिंदेसेना असा प्रवास करणाऱ्या मंडलिक यांनी आतापर्यंत केला आहे हे विशेष !!

कोण आहेत संजय मंडलिक ?

संजय मंडलिक हे कोल्हापुरातील लोकप्रिय नेते दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र. सदाशिवराव हे कागल तालुक्यातील सामान्य कार्यकर्ते. त्यांनी विद्यार्थी दशेपासून काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतलेला. १९६७ साली ते जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. पुढे त्यांनी तीन वेळा विधानसभेची निवडणूक जिंकली. शरद पवार यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी जलसंपदा, शिक्षण विभागाचे राज्यमंत्री पद सांभाळले. दरम्यान तीन वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवून ते खासदार झाले. प्रथम काँग्रेस. दुसऱ्यांदा राष्ट्रवादी. पवार यांच्याशी मतभेद झाल्यावर तिसऱ्यावेळी अपक्ष म्हणून. जिल्ह्याच्या राजकीय, सहकार पटलावर त्यांचा प्रभाव राहिला.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!