IndiaNewsUpdate : लोकसंख्या वाढीच्या मुद्यावरून भाजपनेते मुख्तार अब्बास नक्वी यांचे योगी आदित्यनाथ यांना उत्तर …

लखनौ : सध्या देशातील लोकसंख्या वाढीवरून धार्मिक अल्पसंख्यांकांना टार्गेट केले जात असताना जागतिक लोकसंख्या दिनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबत काही वक्तव्ये केली होती. त्यांच्या या विधानाला भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनीच आपल्या ट्विटद्वारे उत्तर दिले आहे.
उत्तर प्रदेश, देश में आबादी की दृष्टि से सबसे बड़ा प्रदेश है।
जब हम परिवार नियोजन/जनसंख्या स्थिरीकरण की बात करते हैं तो हमें ध्यान में रखना होगा कि जनसंख्या नियंत्रण कार्यक्रम सफलतापूर्वक आगे बढ़े, लेकिन जनसांख्यिकी असंतुलन की स्थिति भी न पैदा होने पाए: #UPCM @myogiadityanath pic.twitter.com/ZD4lyXN8zd
— CM Office, GoUP (@CMOfficeUP) July 11, 2022
आपल्या एका भाषणात योगी आदित्यनाथ म्हणाले होते की, लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रभावी प्रयत्न करत असतानाच समाजातील लोकसंख्येचे संतुलन बिघडू नये याकडेही लक्ष दिले पाहिजे. विशिष्ट वर्गाची लोकसंख्या झपाट्याने वाढते आणि इथल्या मूळ लोकांची लोकसंख्या कमी होईल, असे व्हायला नको.
योगी पुढं म्हणाले की, ज्या देशांमध्ये लोकसंख्या जास्त आहे, तिथे लोकसंख्येचा असमतोल चिंतेची बाब बनला आहे. याचा विविध धर्मांच्या लोकसंख्येवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे काही काळानंतर अराजकता निर्माण होते. दरम्यान योगी यांच्या या वक्तव्याला विरोध दर्शविताना केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि , लोकसंख्येचा स्फोट हा कोणत्याही धर्माचा नाही, ही देशाची समस्या आहे, त्याला जात, धर्माशी जोडणे योग्य नाही.
बेतहाशा जनसंख्या विस्फोट किसी मज़हब की नहीं,मुल्क की मुसीबत है,इसे जाति,घर्म से जोड़ना जायज़ नहीं🙏 #populationday2022
— Mukhtar Abbas Naqvi (@naqvimukhtar) July 11, 2022
-
महानायक ऑनलाईनची वर्गणी भरून “महानायक”ला सपोर्ट करा.
वार्षिक Rs. 999/
मासिक Rs. 99/-
किंवा आपल्या इच्छेनुसार …
PhonePay / GooglePay साठी …
9421671520
डेबिटकार्ड , क्रेडिटकार्ड आणि ऑनलाईन बँकींगसाठी…
https://www.instamojo.com/@mahanayakonline/