मुंबईत टॅक्सीतून ३ कोटी रुपये मूल्याचे विदेशी चलन जप्त
Advertisements
Advertisements
निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने माहीम येथून एका टॅक्सीतून ३ कोटी रुपये मूल्याचे विदेशी चलन जप्त केले असून याप्रकरणी अधिक तपास माहीम पोलीस करत आहेत. फिरत्या तपासणी पथकाने काळ्या पिवळ्या टॅक्सीतून विविध देशांचे चलन जप्त केले असून त्याचे भारतीय मूल्य सुमारे तीन कोटी रुपये इतके असल्याची माहिती माहीम विधानसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती कारले यांनी दिली. टॅक्सीत बसलेल्या दोन इसमांकडून ही रोकड जप्त करण्यात आली असून याबाबत माहीम पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे चलन नेमके कोणत्या कारणासाठी आणण्यात आले, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
Advertisements
