Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नातेवाईक असलेल्या ७५ वर्षीय वृद्धेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून अभियंत्याला अटक

Advertisements
Advertisements
Spread the love

नोकरी शोधण्याच्या निमित्ताने मुंबईतील ७५ वर्षीय वृद्ध महिलेकडे राहणाऱ्या नातेवाईकाने तिच्यावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एप्रिल 2016 मध्ये ही घटना घडली होती. ठार मारण्याची धमकी दिल्याने त्या वृद्धेने याबाबतची तक्रार दाखल केली नव्हती. मात्र, ऑगस्ट 2018 मध्ये त्या महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर निजामुद्दीन रहिमान या ३५ वर्षीय अभियंत्याला बंगळुरू विमानतळावर अटक करण्यात आली. तामिळनाडूतील धरमपुरीमध्ये एका कंपनीत तो कामाला आहे. ही कारवाई सहार पोलिसांनी केली आहे.

Advertisements

परदेशात नोकरी शोधण्यासाठी मुंबईत काही मुलाखती आहेत, असे सांगत लांबचा नातेवाईक असलेला निजामुद्दीन सुमारे दोन महिने आपल्याकडे राहायला होता. एप्रिल 2016 मध्ये त्याने आपल्यावर बलात्कारकेला अशी तक्रार महिलेने ऑगस्ट 2018 मध्ये सहार पोलीस ठाण्यात दाखल केली. त्याने ठार मारण्याची धमकी दिल्याने आपण आजवर तक्रार दाखल केली नसल्याचे तिने सांगितले.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!