Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiRailwayNewsUpdate : मुंबईच्या स्थानकात पाय ठेवताय ? मग आता १० ऐवजी ५० रुपये मोजावे लागतील ….

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : मुंबईतील सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या रेल्वे स्थानकांत पाय ठेवत असाल तर उद्यापासून प्लॅटफॉर्म तिकीटासाठी आता १० रुपयांऐवजी ५० रुपये मोजावे लागणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे. अर्थात हि दरवाढ द्यापासून म्हणजेच ९ मे २०२२ पासून २३ मे २०२२ दरम्यानच्या १५ दिवसांसाठी केली आहे. 

Advertisements

याचे कारण  सांगताना मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे कि , एप्रिल महिन्यात अलार्म चेन पुलिंगच्या ३३२ घटना घडल्या आहेत. अशा गैरकृत्यांमुळे एप्रिल महिन्यात अनेक एक्स्प्रेस रेल्वे उशिरा धावल्या आहेत. यामुळे रेल्वेतील इतर सर्व प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. ही बाब लक्षात घेऊन अलार्म चेन पुलींगच्या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वेनं रेल्वे प्लॅट फॉर्म तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisements
Advertisements

यातील ५३ घटना ह्या योग्य कारणासाठी घडल्या आहेत. तर २७९ प्रकरणांत आरोपींनी कोणते ही कारण नसताना रेल्वेची आपत्कालीन साखळी ओढली आहे. त्यावरून संबंधित आरोपींविरोधात भारतीय रेल्वे कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील बरेच गुन्हे अज्ञात आरोपींविरोधात आहेत. पकडलेल्या आरोपींकडून आतापर्यंत ९४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ही गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेनं पुढील १५ दिवसांसाठी मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ केली आहे. त्यामुळे सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या रेल्वे स्थानकांत येणाऱ्या मुंबईकरांना आता प्लॅटफॉर्म तिकीटासाठी ५० रुपये द्यावे लागणार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!