Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : मजुराचा बायकोसमोर खून, शोध सुरु

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – करोडी परिसरात गट न.१११मधे आज पहाटे १ते२च्यासुमारास मजुराचा त्याच्या बायकोसमोर गळ्यावर चाकूने सपासप वार करुन खून केला.या प्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.अशी माहिती पोलिसनिरीक्षक सुनिता मिसाळ यांनी दिली.

Advertisements

कैलास बियंतसिंग निंगवाल (२७)रा.मध्यप्रदेश छिंदवाडा असे मयताचे नाव आहे.गेल्या तीन चार महिन्यांपासून तो करोडीतील मंगेश जाधव यांच्या शेतावर कामाला होता.त्या ठिकाणी वेअरहाऊस चे बांधकाम सुरु होते त्या ठिकाणी तो मजूरी करंत असे.घटनास्थळी पोलिस उपायुक्त उज्वला वानकर,एसीपी अशोक थोरात, गुन्हेशाखा पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी भेट दिली.

Advertisements
Advertisements

वरील प्रकरणात परिसरातील सी.सी. टि.व्ही.फुटेज तपासण्यात येत आहेत.त्याच प्रमाणे मयताच्या मृत्यूचे कारण अनैतिक संबंध असू शकतात का या दृष्टीकोनातूनही तपास करण्यात येत असल्याचे वरिष्ठ सुत्रांनी सांगितले. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनिता मिसाळ करंत आहेत. या प्रकरणात मयताची पत्नी खुनाची प्रत्यक्ष साक्षीदार आहे.पण तिने खुन्याचा चेहरा पाहिला नसल्याचा जबाब पोलिसांना दिल्याचे निरीक्षक मिसाळ यांनी सांगितले

आपलं सरकार

Click to listen highlighted text!