Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RajThackerayNewsUpdate : भाजप खसदाराचा इशारा , उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही…

Advertisements
Advertisements
Spread the love

लखनौ : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी विरोध केला आहे. अयोध्यामध्ये प्रवेश करण्यापूर्वी  राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागावी. दरम्यान जोपर्यंत ते माफी मागत नाहीत तोपर्यंत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही त्यांना भेट देऊ नये असा सल्लाही सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. राज ठाकरे ५ जून अयोध्यामध्ये रामलाचे दर्शन घेणार आहेत.

Advertisements

खा. बृजभूषण शरण सिंह यांनी गुरुवारी एका पाठोपाठ एक ट्विट करत राज ठाकरेंवर हल्ला चढवला. तसेच, उत्तर भारतीयांचा अपमान केल्याचा आरोप करत, यासाठी राज ठाकरे यांनी माफी मागावी, अशी मागणीही केली आहे.  “उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही. राज ठाकरेंनी अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून तमाम उत्तर भारतीयांची माफी मागावी.”

Advertisements
Advertisements

”राम मंदिर आंदोलनापासून ते मंदिर उभारण्यापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिन्दू परिषद आणि सर्वसामान्यांचीच महत्वाची भूमिका आहे. ठाकरे कुटुंबाचा याच्याशी कसलाही संबंध नाही,” असेही बृजभूषण यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!