Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BhimJayantiNewsUpdate : सोलापुरात 1 रुपये प्रति लिटर दराने पेट्रोल ची विक्री, पेट्रोल घेण्यासाठी लागल्या मोठ्या रांगा…

Advertisements
Advertisements
Spread the love

महेश गायकवाड । सोलापूर : सोलापूर शहरातील डफरीन चौक येथील नामांकित असलेल्या नवल पेट्रोल पंपावर आज केवळ एक रुपये प्रति लिटर या नाममात्र दराने पेट्रोल ची विक्री करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त हा उपक्रम येथे राबविण्यात आला.

आज दिवसभर नागरिकांना केवळ एक रुपये घेऊन एक लिटर पेट्रोल देण्यात आले. पेट्रोल चे दर गगनाला भिडलेले असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागरिकांना एक रुपयांत पेट्रोल देण्याचा उपक्रम सोलापूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टुडंटस, आणि युथ पँथर्स या संघटनांच्या माध्यमातून हा अनोखा राबविण्यात आला, आज दिवसभर एक रुपये दराने पेट्रोल भरण्यासाठी लोकांची दिवसभर रीघ लागली होती, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती च्या निमित्ताने आम्ही उपक्रम राबविले आहे, असे संघटनेचे अध्यक्ष महेश सर्वगोड यांनी सांगितले,

Advertisements

एक रुपयात पेट्रोल मिळत असल्यामुळे पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर मोठी आणि लांबच लांब रीघ लागली होती अशी माहिती पेट्रोल पंप चालकाने प्रस्तुत प्रतिनिधी शी बोलताना दिली.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!