Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : नवाब मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  नवाब मलिक  यांना दिलासा नाहीच. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने  नवाब मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन कोठडी मिळताच नवाब मलिकांची रवानगी आता आर्थर रोड कारागृहात होणार आहे.   त्यांना २१ मार्चपर्यंत कारागृहात ठेवण्याचे निर्देश कोर्टाने  दिले आहेत. दरम्यान मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांची रिमांडमधील चौकशी पूर्ण झाल्याची माहिती ईडीने कोर्टात दिली.


दाऊद इब्राहिमशी संबधित मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना ९ तास चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली होती. ईडीनं मलिक यांना २३ फेब्रुवारीला मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यानंतर न्यायालयानं नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली. ही कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं. तेव्हा त्यांना पुन्हा न्यायालयाने  ७ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. आज मलिक यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.

Advertisements

दरम्यान नवाब मलिक यांच्या वकिलांकडून न्यायालयीन कोठडीसाठी विरोध करण्यात आला होता. ईडीच्या कारवाईला हायकोर्टात दिलेले  आव्हान प्रलंबित असल्याचा दावा वकिलांनी केला होता. मात्र रिमांडमधील चौकशी पूर्ण झाल्याचे  सांगत ईडीने त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली आणि त्यासाठी पीएमएलए कोर्टाने मंजुरी दिली.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!